राज्य सेवा स्पर्धा परिक्षेत प्रथम आलेल्या अमृता ननवरे हिचा सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य सेवा स्पर्धा परिक्षेत मुलींमध्ये राज्यात मुलींमध्ये प्रथम येण्याचा बहुमान कु. अमृता बाबुराव ननवरे हिने मिळवला. या निमित्ताने प्रा. संजय जाधव, मुळेगांवचे उपसरपंच शिवराज जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांनी परिवारीक वातावरणात कु. अमृताचा सत्कार करून तिच्या भावी वाटचालीसाठी अभिष्टचिंतन केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे हिरज येथील कु. अमृता बाबुराव ननवरे हिने सेल्फ स्टडी करीत घेतलेल्या कठोर परिश्रमाने ग्रामीण भागातूनही यश संपादन करू शकतात, हे दाखवून दिले आहे.
याप्रसंगी जाणता राजा बहु. शिक्षण प्रसारक मंडळचे संस्थापक गणेश निळ, न्यु इंग्लीश स्कुल, दोड्डीचे मुख्याध्यापक गंगाधर डोके, मुळेगांवचे सामाजिक कार्यकर्ते भगवान ताकमोगे, आडत व्यापारी सचिन शिंदे, ब्रह्मा म्हेत्रे, खांडेकर सर, सुरवसे सर यांच्या उपस्थितीत कु. अमृताचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
खडतर परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. ग्रामिण भागातील विद्यार्थीही कठोर परिश्रमाने अभ्यास करुन स्पर्धा परिक्षेत यशस्वी होऊ शकतात. त्यासाठी जिद्द अन् चिकाटीही हवी आहे, असे मत
सत्काराला उत्तर देताना कु. अमृताने म्हटले.
-चौकट
एसईबीसी चा लाभासाठी जरांगे-पाटील यांचंही आभार : कु. अमृता नन्नवरे
या यशात त्यांचं कुटुंबीय वडील-आई, बहिण, भाऊ यांचंही योगदान आहे, एसईबीसी च्या दहा टक्के आरक्षणाचा झालेला फायदा याबद्दल मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांचं ही आभार मानायला कु. अमृता विसरली नाही.
0 Comments