Hot Posts

6/recent/ticker-posts

महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी सोलापुरात जन आक्रोश मोर्चा

 महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी सोलापुरात जन आक्रोश मोर्चा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बुद्धगयेतील महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी
भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली सोलापुरात बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन समाज बांधवांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
       भारतरत्न  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मातृ संघटना भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाच्या वतीने देशभर आक्रोश मोर्चाच्या रूपाने आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मोर्चास प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पुढे सिद्धेश्वर प्रशाला मार्गे जिल्हा परिषद समोर पुनम गेट येथे या मोर्चाचा समारोप करण्यात आला.
      बौद्धांचे महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या, 1949 रद्द करा , मुक्त करा.. मुक्त करा.. महाबोधी महाविहार मुक्त करा यासह विविध मागण्यांचे फलक आणि पंचशील ध्वज हाती घेऊन शुभ्र वस्त्र परिधान करून अनेक उपासक - उपासिका सहभागी झाले होते. समता सैनिक दल,  शाक्य संघ, शाक्य सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी बहुउद्देशीय संस्था, महार रेजिमेंट संघ या संघटनेचे सैनिक व पदाधिकारी गणवेशात उपस्थित होते.
         बुद्धगयेतील महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या. सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून 1949 चा व्यवस्थापन कायदा रद्द करावा. मध्य प्रदेशातील महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मभूमी स्मारक तसेच नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी स्मारकाचे प्रबंधन आणि संवर्धन भारतीय बौद्ध महासभेद्वारे व्हावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
         यावेळी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, योगीराज वाघमारे,  दत्तात्रय सिद्धगणेश, अशोक दिलपाक, अंगद मुके, शिवपुत्र घटकांबळे , निर्मला कांबळे, सुमित्रा जाधव, शारदा गजभिये, धमरक्षिता कांबळे, जनार्दन मोरे, प्रदीप ताकपेरे, विनोद जाधव, डॉ. सुरेश कोरे,  त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी करुणादित्य , आदित्य म्हेत्रे, किशोर मोहिते, प्रा. एम. एन. मस्के, प्रशांत गोणेवार, सुनिता गायकवाड, हनुमंत जगताप, आशा शिवशरण, बाबू रणखांबे, देविदास लंकेश्वर, अरुण गायकवाड, विजय साळवे, श्याम शिंगे, राजेंद्र माने, सुनील डांगे, अजीन तळमंडारे, प्रल्हाद चंदनशिवे, बाबासाहेब क्षीरसागर , राजू बाबरे, नंदा काटे, विठ्ठल थोरे, विक्रांत गायकवाड, विनोद इंगळे, विजयानंद उघडे, विजय गायकवाड यांच्यासह समाज बांधव ,भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
        या मोर्चामध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, विविध तरुण मंडळ, महिला मॉर्निंग ग्रुप, महिला मंडळ, शाक्य संघ, महार रेजिमेंट संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च फाउंडेशन, बौद्ध साहित्य समिती, त्रिरत्न बौद्ध महासंघ तसेच डॉ. आंबेडकरी विचारधारा जोपासणाऱ्या  संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments