अकलूज येथे पाच दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळेचे आयोजन
अकलूज (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड टेक्नॉलॉजी तसेच विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त कौशल्य विकास केंद्र (PM USHA योजने अंतर्गत) आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मार्गदर्शन व कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील यांनी दिली.
या कार्यशाळा बुधवार दि. १० सप्टेंबर २०२५ पासून रविवार दि. १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत उदय सभागृह, शंकरनगर, अकलूज येथे होणार आहे. या कार्यशाळेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी,महिला बचत गटांसाठी कौशल्य विकास संधी, पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्ये व संधी तसेच राजकीय नेतृत्वातील कौशल्य विकासाच्या संधी, या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पाचव्या दिवशी इंडस्ट्री व्हिजीट आयोजित केल्या जाणार आहेत. या कार्यशाळेत सहभाग नोंदविल्यास सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
.png)
0 Comments