Hot Posts

6/recent/ticker-posts

ठेंगील वाडा ग्रुप च्या वतीने मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना ब्लॅंकेटचे वाटप.

 ठेंगील वाडा ग्रुप च्या वतीने मोहोळ तालुक्यातील 

पूरग्रस्तांना ब्लॅंकेटचे वाटप. 


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) लांबोटी, राम हिंगणी, कोळेगाव, गोटेवाडी, मुंडेवाडी या महापूरग्रस्त गावातील शेतकऱ्यांना व महापूरबाधित नागरिकांना ठेंगिल वाडा ग्रुपच्या वतीने ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.यावेळी इंडियन मॉडल स्कूलचे अमोल जोशी , दैनिक पुण्यनगरीचे विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी, हॉटेल व्यावसायिक अविनाश ठेंगील ,समर्थ बँकेचे सीईओ संतोष कुलकर्णी, अश्विन डोईजोडे, विरार मुंबईचे उद्योजक संजय सरमळकर, चिमणभाई मुलजीभाई पटेल, अशोक भोसले, अजय तारापुरे ,गोकुळ रंगराजन, विजय गरड, पत्रकार कृष्णकांत चव्हाण, महेश माने आदी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 

या वाटपाची सुरुवात सकाळी नऊ वाजता शिरापूर( सो ) या गावांमधून करण्यात आली होती. यावेळी  ह .भ. प.अशोक काळे बाळासाहेब हरदाडे ,नवनाथ मसलकर, अमोल सावंत यांच्यासह शिरापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहिला महापुर ओसरत नाही तोपर्यंत दुसरा महापूर आल्यामुळे  मोहोळ तालुक्यातील सिना नदीकाठच्या गावाना मोठा फटका बसला आहे. या सर्व शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ठेंगीलवाडा मित्र परिवाराच्या वतीने रविवारी सकाळी प्रत्येक गावातील शेतकऱ्यापर्यंत जाऊन व त्या परिसराची पाहणी करून मदतीचा हात देण्यात आला. यावेळी लांबोटी येथील हॉटेल जयशंकरचे गणेश खताळ, विकास जाधव ,मोहन खताळ, मुंडेवाडी येथील शशिकांत पाटील ,बाळासाहेब व्यवहारे,  हिंगणी येथील पत्रकार मधुकर पाटील किशोर माडकर, आदी मान्यवर उपस्थित होते. 

मुंडेवाडीत दहा दिवसापासून लाईट नाही.

मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी हे गाव पूर्णतः हा महापूर बाधित झालेले आहे. या गावातील विद्युत पुरवठा गेल्या दहा दिवसापासून बंद असल्याच्या व्यथा नागरिकांनी मांडल्या होत्या. त्यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याशी त्वरित संपर्क साधून लाईट जोडण्याबाबत पुण्यनगरीचे वेंकटेश पटवारी यांनी विनंती केली असता त्वरित कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे महावितरण ची अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी सांगितले. 

माणसासाठी काही नको जनावरासाठी चारा द्या 

रामहिणी येथील नागरिकांनी माणसांना आता बऱ्यापैकी मदत मिळत आहे मात्र जनावरांची चाऱ्याअभावी हाल होत आहेत या मुख्या जनावरांना चारा द्या एक वेळ माणसाला काही देऊ नका पण जनावराच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याची विनंती ठेंगील वाडा ग्रुपला केली होती चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शिखर पहारीया यांच्याशी संपर्क साधला असता  त्यांनी त्वरित चाऱ्याची  आम्ही करू किती चारा पाहिजे हे सांगा सोमवारी चारापुरवठा केला जाईल असे सांगितले.

रामहिंगणीकरांची अशीही माणुसकी.

 ठेंगील वाडा ग्रुपच्या वतीने रविवारी गावोगावी फिरून ब्लॅंकेट वाटपाचे काम सुरू होते .या टीममध्ये असलेल्या सर्व सदस्यांना तुम्ही सर्वांसाठी मदतीचा हात देत आहात ,पण तुम्ही जेवलात का ? तुम्ही सकाळपासून काही खाल्लं आहे का? अशी आस्थेने चौकशी करत रामहिणी येथील मधुकर पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी या टीमला आग्रहाने डाळ कांदा ठेचा व ज्वारीच्या भाकरीचे जेवण दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments