महापूरग्रस्तांना दिलासा;
दादा फाउंडेशन व गुजराती मित्र मंडळाकडून किराणा कीट वाटप
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील लांबोटी येथे अतिवृष्टीमुळे सीना नदीला महापूर आला आणि कडेलोट झालेल्या गावातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या आपत्तीग्रस्त कुटुंबांना दिलासा म्हणून दादा फाउंडेशन, गुजराती मित्र मंडळ, सचिन सेल्स व रोटरी क्लब सोलापूर यांच्या वतीने प्रत्येक कुटुंबास किराणा मालाचे कीट वाटप करण्यात आले.
या कीटमध्ये तेल, डाळ, साबण, चादर, गव्हाचे पीठ, बिस्कीट, मसाल्याचे पदार्थ अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असून बाधित कुटुंबांना किमान पंधरा दिवसांचा आधार मिळावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
यावेळी दादा फाउंडेशनचे अध्यक्ष विकास जाधव, ग्रामपंचायत सदस्य मोहन खताळ, सामाजिक कार्यकर्ते समाधान व्यवहारे, कुमार चट्टे, समाधान संतोष खांडेकर तसेच सोलापूरचे शहा परिवार उपस्थित होते. पूरग्रस्तांना दिलेल्या या मदतीमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
0 Comments