Hot Posts

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलावण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ची मागणी

 अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलावण्याची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ची मागणी


मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, जनावरे, घरे तसेच जनजीवन उद्ध्वस्त झाले असून सरकारकडून आवश्यक तेवढी मदत होताना दिसत नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ने केला आहे.

पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर तातडीने ठोस निर्णय व्हावा, शेतकरी व नागरिकांचे प्रश्न ऐकले जावेत, नुकसानभरपाई व मदत पॅकेजवर सखोल चर्चा होऊन भरीव मदतीचा निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांना निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, “आज राज्यातील परिस्थिती बिकट असून सरकारला जाग आणण्यासाठी विशेष अधिवेशन हाच प्रभावी मार्ग आहे. जनतेला दिलासा देणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.”

Reactions

Post a Comment

0 Comments