Hot Posts

6/recent/ticker-posts

जालन्यातील आमरण उपोषणाला मोहोळ धनगर समाजाचा पाठिंबा

 जालन्यातील आमरण उपोषणाला मोहोळ धनगर समाजाचा पाठिंबा


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- जालना येथे धनगर समाजाला SC तून आरक्षण अंमलबजावणीसाठी दिपक बोराडे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळू लागला आहे. मागील बारा दिवसांपासून सुरु असलेल्या या उपोषणाला मोहोळ तालुक्यातील सकल धनगर समाजाने जालना येथे जाऊन आपला ठाम पाठिंबा दर्शविला.या वेळी मोहोळ विधानसभेचे आमदार राजाभाऊ खरे आणि शिवसेना ओबीसी प्रमुख रमेश बारसकर यांनी उपोषणकर्त्यांना पाठिंब्याचे पत्र देऊन आंदोलनास साथ दिली.

समाजाच्या या लढ्यात मराठा समाज बांधव राजु गुंड यांच्यासह सकल धनगर समाजातील गणेश दादा गावडे, मंगेश पांढरे, बापू वाघ, सोमनाथ देवकते, पिंटू होनमाने, श्रीकांत गाढवे, पाटकूलचे ॲड. नितीन गावडे, ॲड. विठोबा पुजारी, संतोष गावडे, रत्नदिप सलगर, अतुल गावडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.मोहोळ तालुक्यातून दहा गाड्यांसह निघालेला समाज बांधवांचा ताफा जालना येथे पोहोचून उपोषणाला थेट पाठींबा दिला. यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.

आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सुरू असलेले हे उपोषण आणि समाजाचा वाढता पाठिंबा लक्षात घेता, राज्य सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी समाज बांधवांकडून होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments