नवरात्रोत्सव काळात रुपाभवानी मंदिरात चोख बंदोबस्त राहणार - प्रताप पोमन (स.पो.आयुक्त)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरचे ग्रामदैवता श्री.रुपाभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सोयी सुविधा,सुरक्षीततेच्या दृष्टीने पोलिस प्रशासन,रुपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक पवार परिवार,रुपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ,वहिवाटदार मसरे यांची संयुक्त बैठक रुपाभवानी मंदिरात घेण्यात आली.
या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सोयी सुविधा सुरक्षितता यावर भर देण्याची सुचना मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक संजय पवार यांनी केले यावर परिमंडळ एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी पोलिस प्रशासन भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर मुलाणी यांनी स्टाॅल धारकांनी आपली वाहने आत आणण्यास मनाई करावे अशा सुचना रुपाभवानी देवस्थान भक्त मंडळाला केले.
यंदाचा नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याच्या दृष्टीने पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचे परिमंडळ एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी प्रसिध्दीमाध्यमांसमोर दिली.
सदर प्रसंगी रुपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाचे अध्यक्ष मल्लिनाथ लातुरे,उपाध्यक्ष संताजी भोळे,श्रीशैल लातुरे,दिलीप पाटील,बाबुराव कोनाळी,मुख्य पुजारी प्रमोद पवार,राजु पवार,सचिन पवार,विराज पवार,स्वप्निल पवार यांच्यासह वहिवाटदार मसरे परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती.
.png)
0 Comments