Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा समाज सेवा मंडळाच्या निवडणुकीसाठी 33 अर्ज दाखल

 मराठा समाज सेवा मंडळाच्या निवडणुकीसाठी 33 अर्ज दाखल




सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- येथील मराठा समाज सेवा मंडळाच्या 2025 ते 2030 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 33 अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. गणेश देशमुख यांनी दिली.
  मंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या 27 सप्टेंबर रोजी होत आहे. पाच पदाधिकारी आणि दहा संचालक अशा एकूण 15 जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे.या निवडणुकीत 226 मतदार असून अध्यक्षपदासाठी मनोहर सपाटे, ॲड. रामचंद्र कदम, उपाध्यक्ष अरुण सोमदळे, ज्ञानेश्वर सपाटे, जनरल सेक्रेटरी प्रा. महेश माने, मुकेश निकम,खजिनदार महादेव गवळी, ब्रह्मदेव पवार, विनायक पाटील यांनी तर सचिव पदासाठी राजेंद्र शिंदे व विनायक पाटील यांनी अर्ज भरले आहेत. संचालक पदासाठी शिवदास चटके, नीलकंठ वाकचौरे,मंगेश जाधव, ज्ञानेश्वर सपाटे, नागनाथ हावळे, नामदेव थोरात,मुकुंद जाधव, राजेंद्र शिंदे,प्रभाकर खंडाळकर, अशोक चव्हाण, विनायक पाटील, कुमार गायकवाड, महादेव गवळी, सुरेश पवार, चेतन साळुंखे, मधुकर पवार, रेखा सपाटे, सुनीता भोसले यांनी अर्ज दाखल केल्याचे ॲड. देशमुख यांनी सांगितले. दरम्यान शुक्रवारी, 12 सप्टेंबर रोजी या अर्जाची छाननी होणार असून 13 ते 16 सप्टेंबर या कालावधीत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 17 सप्टेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून 27 सप्टेंबर रोजी यासाठीची मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याचे ॲड. देशमुख यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments