सात-बारा दुरुस्तीचे आदेश निर्गमित : तहसीलदार मुळीक
मोहोळ (काटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील नावात बदल, सात-बारा उताऱ्यावर क्षेत्रात बदल झालेल्या अशा अडचणींमुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेतेवेळी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांच्या दाखल अर्जावर तत्काळ कार्यवाही करीत नाव बदल, क्षेत्र दुरुस्ती व इतर तांत्रिक अडचणीची दखल घेऊन दुरुस्ती करण्याचे आदेश तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती आदेश निर्गमित केले.
राज्य शासनाच्या माध्यमातून एक ऑगस्ट ते सात आगस्ट दरम्यान महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रांत अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवशी तालुक्यातील मंडलनिहाय १५ शेतकऱ्यांच्या नावात, क्षेत्र यामध्ये अडचणी असणारे अर्ज दाखल झाले होते. या अर्जावर
प्रभावी अंमलबजावणी करून तहसीलदार सचिन मुळीक यांनी सातबारा दुरुस्तीचे आदेश केल्याने
शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचे सात-बारा दुरुस्ती निर्गमित आदेशावर विना विलंब कार्यवाही करून शासकीय योजनेपासून शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे मुळीक यांनी आवाहन केले आहे.
यासाठी निवासी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, निवासी नायब तहसीलदार संदेश भोसले, निवासी नायब तहसीलदार अनिल शहापुरे, महसूल सहाय्यक प्रवीण जगताप, महसूल सहायक अजित वाघमोडे, गणेश सगेल, अव्वल कारकून वर्षा अधटराव, गौरव आवारे, अजित आवटे हे काम पाहत आहेत.
चौकट
पीक नोंदणीसाठी आवाहन
खरीप हंगामात पीक नोंदणी १ ऑगस्टपासून ४५ दिवसांपर्यंत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पीक नोंदी करून शासकीय विविध योजनेचा लाभ, नुकसानभरपाईच्या प्रक्रियेत समाविष्ट होण्याकरिता नोंदी करणे अनिवार्य आहे.
0 Comments