Hot Posts

6/recent/ticker-posts

मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

 मनोरमा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मनोरमा मल्टी स्टेट को - ऑप. क्रेडीट सोसायटीची  १४  वी वार्षिक सर्वसाधारण सभा बेन्नूर नगर येथील मनोरमा भवनात येथे शुक्रवार (ता. १५) सकाळी उत्साहात पार पडली.
प्रारंभी ज्येष्ठ सभासद, संचालक यांच्या हस्ते दीप्रप्रज्वलन करण्यात आले.
सभेच्या सुरुवातीस डॉ.ऋचा मोरे - पाटील यांनी प्रस्ताविक करत सभेला सुरुवात केली त्यानंतर सीईओ कविता कुलकर्णी व डेप्युटी सी.ई.ओ  यांनी क्रमवार विषय वाचन केले.
यावेळी चेअरमन शोभा मोरे यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारत सभासद, ठेवीदारांशी संवाद साधत ग्राहकांच्या ठेव सुरक्षेला प्राधान्य हेच मनोरमा मल्टीस्टेटचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन केले. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे काम मनोरमा मल्टीस्टेट करत आहे. अवघ्या ७२ तासातच ५० टक्के कर्जे ही लघु उद्योगाला देण्याचे ठरवण्यात आले आहे. संस्थेच्या  अहवाल सालातील आर्थिक प्रगतीचा आलेख मांडला. संस्थेचे एकूण मिश्र व्यवसाय आजपर्यंत ९८३.०५ कोटी व नफा ४.७० कोटी झाल्याचे सांगून सभासदांना १०% लाभांश देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे चेअरमन शोभा मोरे  यांनी दिली.
व्यासपीठावर मनोरमा परिवाराचे मार्गदर्शक श्रीकांत मोरे काही यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभासद, ठेवीदारांशी संवाद साधला. व्हा. चेअरमन शिल्पा कुलकर्णी,  कार्याध्यक्षा डॉ. मिताली मोरे, संचालक डॉ.ऋचा मोरे –पाटील, डॉ.मनीषा पाटील, प्रशांत शापुरकर,कमलाकर पुजारी,मधुकर आठवले, पांडुरंग पाटील, मिलिंद भोसले,  सीए मैनुद्दिन नदाफ आदी उपस्थित होते. प्रसंगी सीए मैनुद्दिन नदाफ यांचा सत्कार संचालक प्रशांत शहापूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक मंडळासह सभासद, खातेदार, अधिकारी, कर्मचारी, मनोरमा परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.
आभार कार्याध्यक्ष डॉ. मिताली मोरे यांनी मानले व वार्षिक सर्वसाधारण सभा हसत खेळत, आनंदी वातावरणात संपन्न झाली.

Reactions

Post a Comment

0 Comments