Hot Posts

6/recent/ticker-posts

अतिरिक्त शुल्क मागितल्यास कारवाई

 अतिरिक्त शुल्क मागितल्यास कारवाई

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेतल्याच्या तक्रारी वाढत असल्याने, राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. तंत्र शिक्षण संचालनालय आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सर्व शैक्षणिक संस्थांना शुल्क नियामक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारू नये, असे स्पष्ट आदेश परिपत्रात दिले आहेत.


या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही शासनाने दिला आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संस्था - महाविद्यालये अतिरिक्त शुल्क घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाने ही पावले उचलली आहेत.


अशा परिस्थितीत विद्यार्थी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकणार आहे. ही नवीन नियमावली सर्व व्यावसायिक पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका या अभ्यासक्रमांच्या संस्था लागू असणार आहे.


चौकट 

काय आहेत प्रमुख नियम ?

प्रत्येक संस्थेने त्यांच्या सर्व अभ्यासक्रमांचे शुल्क मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये संस्थेच्या वेबसाईटवर आणि सूचना प्रदर्शित करणे अनिवार्य. महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियम, २०१५ फ नुसार, ठरवलेल्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क घेणे 'नफेखोरी' मानले जाईल. अशा संस्थांवर कलम २० नुसार कारवाई केली जाईल.शासनाच्या योजनांसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून शुल्क घेताना, त्यांना मिळणारी शिष्यवृत्ती वजा करूनच उर्वरित शुल्क घ्यावे.


चौकट 

तक्रार निवारणासाठी हेल्पलाइन

अतिरिक्त शुल्काची मागणी होत असल्यास, विद्यार्थी थेट तक्रार करू शकतील. त्यासाठी राज्य सामाईक परीक्षा कक्षाच्या वेबसाइटवर मदत दूरध्वनी क्रमांक आणि तिकीट लिंक उपलब्ध करून दिली आहे. यासाठी विद्यार्थी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ७७००९१९८९४ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Reactions

Post a Comment

0 Comments