Hot Posts

6/recent/ticker-posts

आ.अभिजीत पाटलांचे माढ्यातील दहीहंडी कार्यक्रमात राजकीय वक्तव्य-अजिक्यतारा मंडळाचे १२ वर्षापासून उपक्रम

 आ.अभिजीत पाटलांचे माढ्यातील दहीहंडी कार्यक्रमात राजकीय वक्तव्य-अजिक्यतारा मंडळाचे १२ वर्षापासून उपक्रम




माढा (कटूसत्य वृत्त):- २०२४ ची माढ्याची दहीहंडी  तुमच्या साथीने मला  फोडता आली.आता या पुढची पण  दहीहंडी आपणच तुमच्या पाठबळावर नक्कीच फोडुयात असे वक्तव्य 
माढ्याचे आमदार अभिजीत पाटलांनी  माढ्यातील दहीहंडी कार्यक्रमात केले.

माढ्यातील अजिक्यतारा मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बाजार पटांगण  चौकात दही हंडी उत्सव  पार पडला.याचे उद्घघाटन आमदार पाटील यांच्या हस्ते पार पडले.यावेळी पाटील बोलत होते.

जिल्हा दुध संघाचे माजी संचालक राजेंद्र चवरे  यांनी मागील १२ वर्षापासून दही हंडी उत्सव  उपक्रम राबवत असल्याचे सांगताना  विरोधकांनी या दंहीहंडी उत्सवावर टीका केली.मात्र त्यांना सण उत्सव  परंपरेची कदाचित  माहिती नसावी.सण उत्सवाला जर ते करमणूकीचे कार्यक्रम म्हणत असतील तर त्यांना काय बोलावे  अशी टीका चवरेनी  केली.

यंदाची दहीहंडी फोडण्याचा मान शिवशाहीने प्रतिष्ठानने   पटकावला.२१ हजारांचे पारितोषिक व चषक देऊन  अध्यक्ष यश मस्के,आदित्य चव्हाण,अक्षय शिंदे,
निलेश चव्हाण यांच्यासह मंडळाच्या सर्व सदस्यांचा सन्मान करण्यात आला.

दहीहंडी उत्सवात शिवशाही आरमार,शिवशाही प्रतिष्ठान,
वेदांत साठे मित्रपरिवार,दारफळ मित्रपरिवार यासह अन्य मंडळानी सहभाग नोंदवला.

यावेळी अभिजीत पाटील बोलताना पुढे म्हणाले,
आपल्या सर्वांच्या साथीने, सर्वांच्या प्रेमाने व आशीर्वादाच्या जोरावर आपण  २०२४ची विधानसभेची दहीहंडी फोडली.२०२५ ची देखील हंडी तुमच्या पाठबळावर फोडुयात .असा 
विश्वास ठामपणे व्यक्त करताना मी माढ्याचाच आहे.मागील ३० वर्षात जेवढ्या वेळेस लोकप्रतिनिधी माढ्यात आले नाहीत.त्याहुन अधिक पटीने माढ्यात आलो.आपल्या सर्व सुज्ञ जनतेच्या पाठबळावरच विधानसभेत आवाज उठवत आहे.

यावेळी संजय पाटील घाटणेकर,भारत शिंदे,झुंजार भांगे,राजेंद्र चवरे,आनंद कानडे,हनुमंत पाडूळे,ज्योती कुलकर्णी,शहाजी साठे,शंभु साठे,आबा साठे,निलेश मोरे,अरविंद खरात,शंभु चवरे,शाहु चवरे,आबा चवरे  आदी उपस्थित होते.सुत्रसंचलन सुहास चवरे यांनी तर आभार शाहु चवरेनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments