Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डूवाडी बस स्थानक परिसरात गटारीचे पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय

 कुर्डूवाडी बस स्थानक परिसरात गटारीचे पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय




कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- येथील बस स्थानक परिसरात गटारीचे आणि पावसाचे पाणी साचल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आकाश (भाऊ) लांडे यांनी कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
आकाश लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्डूवाडी बस स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना गटारीच्या घाण पाण्यातून वाट काढावी लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात कुर्डूवाडी आगाराचे प्रमुख मा.प्रसाद लाड यांनी अनेकदा नगरपरिषदेकडे तक्रार केली आहे. त्यांनी ३ जुलैपासून सातत्याने पाठपुरावा करूनही नगरपरिषदेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
ही जागा बस स्थानकाच्या हद्दीत येत नसून ती नगरपरिषदेच्या हद्दीत असल्यामुळे ही जबाबदारी नगरपरिषदेची असल्याचे आगार प्रमुख लाड यांनी स्पष्ट केले आहे. नगरपरिषदेच्या या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून, पावसाळ्याच्या दिवसांत रोगराई पसरण्याची शक्यताही वाढली आहे.
या प्रकरणी नगरपरिषदेने तातडीने लक्ष घालून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी आकाश (भाऊ) लांडे यांनी केली आहे. या समस्येवर त्वरित तोडगा न काढल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments