शंकरनगर येथील डॉ.सुप्रिया सावंत आयुर्वेद पीजी पात्रता परीक्षेत देशात तिसरी
अकलुज (कटूसत्य वृत्त):- शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेची शंकरनगर येथील माजी विद्यार्थीनी डॉ.कु. सुप्रिया सदाशिव सावंत यांनी आल इंडिया आयुर्वेद पदव्युत्तर पात्रता परीक्षेत (पीजी)देशात तिसरा क्रमांक मिळवुन नेत्रदीपक यश संपादन केले.
कु.सुप्रिया सावंत या स.म.शंकरराव मोहिते-पाटील विद्यालय व ज्यु.कॉलेज वेळापूर येथील सेवानिवृत्त सहशिक्षक सदाशिव सावंत यांची कन्या असुन त्यांनी आनलाईन क्लास बरोबर च स्व:ताच्या बुध्दी कौशल्याने 480 पैकी 370 गुण मिळवुन देशात तिसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या.त्यांचा पर्सेंटाईल स्कोअर हा 99.98 असुन जनरल ईडब्ल्यूएस मध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला आहे.
डॉ सुप्रिया यांनी अहिल्यानगर येथुन जी.एस.गुणे आयुर्वेदीक महाविद्यालयातून बीएएमएसचे शिक्षण पूर्ण केले होते.त्यानंतर आयुर्वेद क्षेत्रातील एम.डी. शिक्षणासाठी त्यांनी एआयएपीजीइटी परीक्षा दिली होती.डॉक्टर सुप्रिया यांनी देशपातळीवर मिळविले ल्या या उज्वल यशाचे सर्व स्तरातुन कौतुक होत असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावे ळी सुप्रिया यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील,आजीआजोबा, भाऊ व कुटुंबातील सदस्यांना दिले व सर्वांनी आपल्याला साथ आणि प्रेरणा दिल्याचे सांगितले. तसेच आयुर्वेद ऊच्च पदवी प्राप्त करुन जनसेवा करणार असल्याचे सांगितले.
*मुलीने अथक परिश्रम करुन देशपातळीवर उज्वल यश संपादन केलै आहे. तिने अभ्यासाबाबतीत कधीही तडजोड केली नाही.यश मिळवायचे च आणि आईवडीलांच्या कष्टाचे चिज करायचं ही जिद्द मनाशी बाळगुन मुलगी सुप्रियाने घवघवीत यश संपादन केले व मुलीही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होवु शकतात है दाखवुन दिले. जिद्द,सातत्य आणि आत्मविश्वास असेल तर काहीही अशक्य नसते याचा प्रत्येय आला.जिवन सार्थकी लागलं*
-सदाशिव सावंत(वडील)
0 Comments