Hot Posts

6/recent/ticker-posts

काम करा अन्यथा घरचा रस्ता धरा : उपायुक्तांचा इशारा

 काम करा अन्यथा घरचा रस्ता धरा : उपायुक्तांचा इशारा

महापालिकेच्या तीन आरोग्य केंद्राची अचानक पाहणी; कर्मचाऱ्यांची झाडाझडती
सोलापूर : महापालिकेचे नाव खराब होऊ नये याची काळजी घ्या. रुग्ण, गर्भवती महिला यांना चांगली सेवा देण्याचे काम करा; अन्यथा घरचा रस्ता दाखवण्याचा इशारा उपायुक्त अशिष
लोकरे यांनी दिला. 
महापालिका रुग्णालयातील  प्रसूतीगृहात येणारे रुग्ण पळविण्याच्या प्रयत्नातून पालिकेची मोठी बदनामी होत असल्याने उपायुक्त लोकरे यांनी महापालिकेच्या तीन आरोग्य केंद्राची अचानक पाहणी केली. या भेटीत गौरसोयी आढळून आलेल्या आणि अनेक वर्षांपासून एका हॉस्टिपलमध्ये ठाण मारून असलेल्याची झाडाझडती घेतली.
सीएसआर फंडातून मोठ्या प्रमाणात खर्च करून महापालिकेचे आरोग्य सेवा सुधारत आहे. चांगली
यंत्रणा आहे. महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्यावाढली आहे.
मात्र महापालिकेची आरोग्य केंद्रे, प्रसूतीगृहात अनेक डॉक्टर, परिचारिका अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी ठाण मारून आहेत.  त्यांची त्या हॉस्पिटल मध्ये मक्तेदारी निर्माण झाली आहे. त्यातून खासगी हॉस्पिटल कडर रुग्ण पाठवण्याचे प्रकार घडले आहे. त्या शिवाय हे रुग्णांसोबत व्यवस्थित बोलत नाहीत.
या पार्श्वभूमीवर उपायुक्त आशिष लोकरे, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, डॉ. वैशाली शिरशेट्टी यांनी सर्व डॉक्टर्स, आरोग्य सेविका यांची बैठक घेतली. डॉक्टरांच्या बैठकीनंतर मेट्रन आणि परिचारिकांची
स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत चांगलाच गदारोळ झाला.
आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या प्रसूतीगृहांमधील डॉक्टर्स रुग्णांसोबत कशा वागतात, किती वेळ देतात तक्रारी करण्यात आल्या.
चौकट १ 
कर्मचारी वर्षापासून एकाच हॉस्पिटलमध्ये
उपायुक्तांच्या झाडाझडीत महापालिकेची आरोग्य केंद्रे, प्रसूतीगृहात तीन वर्षा पेक्षा जादा तर काही दहा वर्षापासून एकाच हॉस्पिटल मध्ये एकाच टेबलवर ठाण मारून असल्याचे निदर्शनास आल्याने अशा कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यांच्या बदली टांगती तलवार आहे. लवकरच बदल्या करण्याचे संकेत उपायुक्तांनी दिले आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments