मोहोळ येथे २० ऑगस्टला दहीहंडीचे आयोजन
मोहोळ : (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहर मध्यवर्ती दहीहंडी उत्सव समिती व मोहोळ शहरामध्ये मध्यवर्ती दहीहंडी उत्सव समितीच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावेळी दि. २० ऑगस्ट रोजी मोहोळचे प्रथम आयोजित करण्यात नगराध्यक्ष रमेश आलेल्या दहीहंडी बारसकर यांच्या संकल्पनेतून उत्सव कार्यक्रमासाठी इंदापूर व बारामती मोहोळ येथे दहीहंडी उत्सव कार्यक्रमाचे आयोजन दि. २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजता मोहोळ नगरपरिषद कार्यालयासमोर करण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठया दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेचे ओबीसी राज्य प्रमुख रमेश बारसकर यांनी केले आहे.
मोहोळ शहरामध्ये मध्यवर्ती दहीहंडीउत्सव समितीच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावेळी दि. २० ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सव कार्यक्रमासाठी इंदापूर व बारामती येथील गोविंदा पथकाला निमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी प्रथम पारितोषिक २ लाख २२ हजार २२२ असूनद्वितीय पारितोषिक १ लाख ११ हजार १११ रुपये ठेवण्यात आले आहे. या नयनरम्य सोहळयाचे प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी असणार असून महिलांना दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन बारसकर यांनी केले आहे.
यावेळी माजी नगरसेवक अतुल क्षीरसागर, विधानसभा प्रमुख मंगेश पांढरे, ओबीसी तालुकाप्रमुख
गणेश गावडे, युवा सेना शहरप्रमुख सागर अष्टूळ, सुलतान पटेल, सोमनाथ माळी उपस्थित होते.
0 Comments