राजराजेश्वरी संगीत विद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी शिक्षण संकुलातील राजराजेश्वरी संगीत विद्यालयाचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थाध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या मार्गदर्शनखाली, प्राचार्य रविशंकर कुंभार, प्रमुख अतिथी ज्येष्ठ संगीत साधक श्याम नाईकनवरे, सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले, संगीत विद्यालयाचे संचालक प्रवीण कुंभार, तबला विशारद ऋतुराज सोनवणे, संगीत विद्यालय समन्वयक विश्वाराध्य मठपती, ज्येष्ठ शिक्षक शिवकुमार शिरुर, हणमंत कुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रथम श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच वाद्यवृंदाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संगीत विद्यालयातील विद्यार्थी अपर्णा तुम्मा, लहरीका गोने, शिवराज घंटे, रक्षिता सुंकनपल्ली, आलेक्या कोंतम, शाश्वत मठपती, वैष्णवी घंटे, पूर्वा रेके, शुभम तट्टे, जान्हवी कांबळे, स्वराली रॅका, हेमा जुंजा, प्रचिता श्रावण, भक्ती पुजारी, भक्ती कुंभार, आराध्या जमादार आदींनी भूपाळी, दुर्गा, काफी, यमन, खमाज, भैरवी या रागातील बंदीश तसेच ओंकार प्रधान रुप गणेशाचे, देहाची तिजोरी, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पाऊले चालती पंढरीची वाट, कभी राम बनके कभी श्याम बनके, लकडी की काठी, अशी चिकमोत्याची माळ, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो ही आदी विविध गीते सादर करून उपस्थित रसिकांची मने जिंकली.
तबला विभागातील गणेश चपळगाव, भरत गडगी, सिद्धार्थ नल्ला या विद्यार्थ्यांनी तीन ताल कायदा आणि रेला यांची अप्रतिम कला सादर केले. मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
0 Comments