नवनिर्वाचित कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने सत्कार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे कुटुंबाला कसलाही राजकीय वारसा नसताना शेतकऱ्याचा मुलगा ते राज्याचे कृषीमंत्री पुण्याचा बहुमान आमदार दत्तात्रय भरणे यांना मिळाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक व विश्वासू आमदार म्हणून भरणे यांचे महाराष्ट्र राज्यांमध्ये ओळख आहे प्रामाणिकपणा, पक्षनिष्ठा त्यामुळेच नुकतेच दत्तात्रय भरणे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्रालयाची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्यावर दिली.दत्तात्रय भरणे यांनी कृषी मंत्रालयाचा पदभार देखील स्वीकारला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी ईच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीनं राज्याचे नवनिर्वाचित कृषिमंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर येथील भरणेवाडी निवासस्थानी येथे दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी निलेश कांबळे, संतोष गायकवाड, महादेव राठोड, आनंद गाडेकर, वसंत कांबळे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की मी शेतकरी कुटुंबातील साधे व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहे भरणे कुटुंबाला कसलाही राजकारणातील घराण्याच्या आईचा वारसा नाही केवळ प्रामाणिकपणा व पक्षनिष्ठा यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर कृषी मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार आहे शेतकऱ्यांचा सन्मान शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषी मंत्री पदाचा मान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे असे ते म्हणाले. दरम्यान यावेळी किसन जाधव यांनी दत्तात्रय भरणे यांच्या पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments