सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने ग्रंथालय कार्यशाळा
कोर्टी (कटूसत्य वृत्त):- शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविण्यात येतात. ग्रंथालयांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी सतत अद्ययावत राहिले पाहिजे.
त्यातून अधिक चांगल्या सेवा सुविधा देत वाचक भीमूक होता येईल असे प्रतिपादन ग्रंथमित्र
जिल्हा ग्रंथालय संघाचे मार्गदर्शक कुंडलिक मोरे यांनी केले. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या वतीने
ज्ञानेश्र्वर वाचन मंदिर, करमाळा जि. सोलापूर येथील सभागृहात एक दिवसीय कार्यशाळेचे
आयोजन करण्यात आले होते. प्रथमता कुंडलिक मोरे व जिल्हा ग्रंथालय संघाच्या लिपिक
वृषाली हजारे यांच्या हस्ते थोर समाजसेवक राजा राममोहन रॉय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात
आले.प्रास्ताविक राजीव गांधी सार्वजनिक वाचनालय, रावगावचे सचिव भास्कर पवार यांनी केले.
मोरे यांनी राजा राममोहन राय फाउंडेशन, कोलकत्ता यांच्याकडून देण्यात येणाऱ्या समान असमान निधी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने ग्रंथालयांसाठी नवीन इमारत बांधकाम करणे,जुनी इमारत विस्तारीकरण करणे,चिल्ड्रन कॉर्नर, ग्रंथ व फर्निचर निधी, फिरते ग्रंथालय, मोबाईल
व्हॅन, ग्रंथालय परिसंवाद व ग्रंथ प्रदर्शन, संगणक संच, तसेच ५०/७५/१००/१२५ वर्ष पूर्ण झालेल्या ग्रंथालयांना विशेष निधी, दिव्यांग वाचकांना सुविधा, ज्ञान कोपरा तयार करणे, स्वच्छ भारत अभियान इत्यादी योजना, सेवा सुविधा संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.जिल्हा ग्रंथालय संघाच्या लिपिक वृषाली हजारे यांनी एनजीओ पोर्टल याविषयी लागणारे दस्तऐवज व आरआरआरएलएफ यांच्या लिंक वर जाऊन प्रत्येकाने वाचनालय रजिस्टर करून घेण्याचे आवाहन केले.यामुळे या कोणत्याही फाउंडेशनचा लाभ स्वरूपाचा घेण्यास सोयीस्कर जाणार आहे.
0 Comments