Hot Posts

6/recent/ticker-posts

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा- शशिकांत शिंदे

 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कामाला लागा- शशिकांत शिंदे




मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जीवाचे रान करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल भैरवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते कोरेगाव येथे शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रांतिक सदस्य राहुल शहा, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, कार्याध्यक्ष संतोष रंदवे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष शिंदे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचे आवाहन केले. यावेळी उपाध्यक्ष अनिल सावंत त्यांच्याशी चर्चा केली.

Reactions

Post a Comment

0 Comments