Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुर-मुंबई-दिल्ली अशी थेट विमान सेवा सुरू करा - खा.मोहिते पाटील

 सोलापुर-मुंबई-दिल्ली अशी थेट विमान सेवा सुरू करा - खा.मोहिते पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री खा. मुरलीधर मोहोळ यांची खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी सोलापूर-मुंबई-दिल्ली अशी थेट विमान सेवा सुरू करण्याची मागणी केली. या सेवेमुळे सोलापूर आणि परिसरातील नागरिकांना मुंबई आणि दिल्ली येथे प्रवास करणे सुलभ होईल, तसेच व्यापारी आणि व्यावसायिक संबंधांना चालना मिळेल म्हणून सांगितले.


यासोबतच, खासदार मोहिते-पाटील यांनी राज्यात ज्या ठिकाणी नवीन विमानसेवा सुरू करणार आहेत त्या ठिकाणाहून तातडीच्या कामानिमित्त जिल्हाधिकारी व जि.प.
मुख्याधिकारी यांच्या सोबतच इतरही सरकारी कर्मचाऱ्यांना कामानिमित्त मुंबई मंत्रालयात जाण्यासाठी विमान प्रवासाची परवानगी आणि सवलत देण्याची मागणी केली. यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल आणि कामकाजात गती येईल, असे सांगितले

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले. या भेटीमुळे सोलापूरच्या कनेक्टिव्हिटी आणि विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

यावेळेस भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे,हिंदकेसरी पै.योगेश दोडके उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments