डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुना मागील सूत्रधार शोधा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 22, 2025

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुना मागील सूत्रधार शोधा

 डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुना मागील सूत्रधार शोधा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या खुना मागील सूत्रधार अद्याप मोकाट आहेत त्यांचा शासनाने शोध घेतला पाहिजे अशा आशयाचे निवेदन आज डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, विवेकवादाचा प्रसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजविण्यासाठी आयुष्य वेचले. समाजाला विचार करण्याची ताकद, प्रश्न विचारण्याचं धैर्य आणि तर्कशुद्धतेचा मार्ग दाखविला.
जादूटोणा विरोधी कायदा होण्यासाठी डॉ. दाभोलकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. अतिशय ओघवत्या भाषेत त्यांनी आयुष्यभर अंधश्रद्धेच्या विरोधात समाजाचे प्रबोधन केले. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला आज 12 वर्षे पूर्ण झाली. तरीही त्यांच्या खऱ्या मारेकऱ्यांने आजही पोलिस आणि सरकारने पकडलेले नाही. त्यांचा शोध घेतला पाहिजे असे निवेदनात म्हंटले आहे
निवेदन दिल्यानंतर बोलताना राज्य कार्यकारिणीच्या सदस्य उषा शहा म्हणाल्या की  आम्ही सारे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश आहोत हे ठणकावून सांगूया... त्यांनी रुजवलेली विवेकाची बीजे, अंधश्रद्धेविरोधातली लढाई आणि विज्ञानाधारित विचारांची परंपरा पुढे घेऊन जाऊया तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
निशा भोसले म्हणाले की डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांना, त्यांच्या लढ्याला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी सर्व अंनिस च्या कार्यकर्त्यांनी स्वीकारले आहे आता आपण अंधश्रद्धेच्या विरोधात लढावयाचे आहे सरकारकडे मारेकऱ्यांचा शोध घ्यावा यासाठी जोरदार पाठपुरावा करणार आहोत.
प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना अध्यक्ष शंकर खलसोडे  यांनी निवेदन दिले  यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य निशा भोसले उषा शहा अँडवोकेट सरिता मोकाशी सचिव लालनाथ चव्हाण व्हि  डी गायकवाड मधुरा सलवार आर डी गायकवाड डॉ निनाद शहा डॉ डी वाय  पांडगळे लता ढेरे शकुंतला सूर्यवंशी सुनिता गायकवाड मिलिंद गायकवाड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages