Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रावण सोमवार शिवपार्वती मंदिरात महाआरतीचे आयोजन

 श्रावण सोमवार शिवपार्वती मंदिरात महाआरतीचे आयोजन




अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाशिवरात्र यात्रा समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर यांच्या वतीने  पवित्र श्रावण मासाच्या समाप्ती निमित्त सोमवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7:00 वाजता शंकरनगर येथील श्री शिवपार्वती मंदिरात महाआरतीचे आयोजन केले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
             या श्रावण महिन्यात शिवपार्वती मंदिरात अखंड नामजप सोहळा  सुरू आहे.  याच कालावधीत दिनांक 3 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2025 या चार दिवसांमध्ये शिवलीलामृत ग्रंथ पारायण  पार पडले . या पारायणात पंचक्रोशीतील सुमारे 1,350  महिला सहभागी झाल्या होत्या.
               स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली महिलांसाठी  नागपंचमी सणा निमीत्त 28 व 29 जुलै 2025 रोजी दोन दिवस सांस्कृतिक वारसा असणाऱ्या विविध पारंपारिक खेळ व उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये हजारो महिला, मुलीं पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन पारंपारिक खेळाचा आनंद लुटला. या सणाच्या निमित्ताने ग्रामीण व शहरी भागात दुर्मिळ होत चाललेल्या सांस्कृतिक खेळास व परंपरेस उजाळा मिळाला आहे.
            श्रावणात मंदिर परिसरात नेहमीच सर्वधर्मीय  भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहते. श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी मंदिरात रुद्राभिषेक, आरती, धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे वाटप केले जाते. या परिसरात एक भक्तीमय व नाविन्यपूर्ण उत्साहाचे वातावरण निर्माण झालेचे दिसून येत आहे
                 श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी दि.18 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7:00 वाजता शिवपार्वती मंदिरात  महाआरतीचे आयोजन केले असून भाविकांनी सहकुटुंब उपस्थित रहाण्याचे आवाहन यात्रा समितीचे अध्यक्ष जयसिंह मोहिते- पाटील यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments