सोलापूरात रोजगार थंड, उत्सव झाले उदंड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सार्वजनिक उत्सव वेळी शहर पोलिस बंदोबस्तासाठी असतात. इतर शहरांच्या तुलनेत सोलापूर येथे १८० दिवस जयंती, उत्सव असल्याने मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्तात गुंतलेले असतात. परिणामी पोलिसांच्या गुन्हे अन्वेषणाला गती मिळत नाही. सार्वजनिक उत्सव मंडळ, सामाजिक संस्था, संघटनांनी पोलिसांच्या मदतीविना समाजपयोगी उपक्रम राबवले तर सामाजिक पोत सुधारण्यास उपयोग करून घेता येईल. तसेच शहराची उत्सवी शहर म्हणून असलेली छाप पुसता येईल.
मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती या शहरांत होत नाहीत तेवढे जयंती, उत्सव, सण, समारंभ शहरात साजरे होतात. वर्षातील आठ महिने पोलिस बंदोबस्तात असतात. ज्या कामावर लक्ष केंद्रित करणे गरजे आहे त्यावर पोलिसांकडून होत नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढतेय. म्हणजे घरफोड्या, चोऱ्यांचा तपास होत नाही. वाहतूक नियोजन करता येत नाही. उत्सव कमी वेळेत, सामाजिक उपक्रम रावबत, मिरवणुकीतील गोंगाट कमी झाल्यास ताण कमी होईल.
जे उत्सव अन्य शहरात होत नाहीत ते सोलापुरात होतात. आपण बहुभाषिक शहर म्हणतो. उत्सवाचा आनंद घेण्याचा साजरा करण्याचा प्रत्येकाला कायद्याने अधिकार आहे, तो कायद्याच्या चौकटीत. काही गोंधळ झाल्यास पोलिसांना जबाबदार धरण्यात येते. मुख्य उद्देश म्हणजे पोलिसाविना मिरवणुका, डॉल्बी नको, मद्य प्राशन करून नाचगाणे नको. या बाबींचा विचार झाल्यास उत्सव आनंददायी आणि विनासायास पार पडेल.
उत्सवम्हटले की मिरवणुका आल्याच. कोण किती खर्च करतो अशी स्पर्धा मंडळात लागली आहे. हे बदलून विधायक आणि वेगळे उपक्रम राबवण्याची मानसिकता निर्माण झाली पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रम, सामुदायिक विवाह सोहळासारख्या उपक्रमातून लोकांना सहभागी करून घेतले जावे. मिरवणुकीचा खर्च टाळून विधायक कामाकडे वळण्याची गरज आहे.''
उत्सवसाजरे करण्यात यावेत. पण, त्यातून सामाजिक पोत सुधारण्यावर भर देण्यात यावा. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवणे, शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, शैक्षणिक साहित्य वाटप, अन्नदान, रुग्णांना मदत आदी सामाजिक उपक्रम राबवल्यास पैशाचे दान सत्कर्मी लागेल. उत्सव कमी वेळेत, कमी पैशात कसे साजरे करता येतील याबाबत विचारमंथन पाहिजे.
आपल्याकडेजणू उत्सव साजरे करण्याची स्पर्धा लागली आहे. हा पायंडा अलिकडील काळात पडला आहे. पूर्वी ठरावीक उत्सव, जयंती साजरे होत. आता संख्या वाढलीय. कोणते मंडळ किती मोठे डॉल्बी लावतात, मिरवणुकीत किती खर्च करतो, त्याच्याहून अधिक खर्च आपण कसे करू यातून स्पर्धा लागते. व्यापारी, उद्योजक, दुकानदार यांच्याकडून जबरदस्तीने वर्गणी घेणे, दिली नाही तर धमकावणे असे प्रकार घडतात.
सिध्देश्वरयात्रा, गणपती, नवरात्र, डॉ. आंबेडकर जयंती, मोहरम, शिवजयंती, अण्णा भाऊ साठे जयंती यावेळी मोठा बंदोबस्त असतो. त्याशिवाय महाराणा प्रताप जयंती, वीरशैव कय्यया जयंती उत्सव, मार्कंडेय रथोत्सव, वाल्मीकी जयंती, ईद मिलाद, बसवेश्वर जयंती, शिवा काशीद, जांबमुनी महाराज उत्सव, अहिल्यादेवी होळकर उत्सव, शंभूराजे जयंती उत्सव यासह १८० उत्सव साजरे होतात.
जयंती,उत्सव काळात मिरवणूक मार्गावर दिवसभर वाहतूक बंद असल्यामुळे प्रवासी, रुग्ण यांचे हाल होतात. पर्यायी मार्गाचा वापर करताना दमछाक होते. डॉल्बीच्या आवाजाने रुग्ण, मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो.पोलिसांवर सोळा ते अठरा तास कामाचा ताण असतो.
डीजेमुळे होणारे ध्वनी प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. डीजे सिस्टीममधून निघणारा प्रचंड आवाज ध्वनी प्रदूषणाला कारणीभूत ठरतो. या आवाजामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात आणि त्यामुळे अनेक ठिकाणी डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. कायद्यानुसार, डीजेमुळे ध्वनी प्रदूषण झाल्यास ५ लाख रुपयांपर्यंत दंड आणि ५ वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
डीजेच्या आवाजामुळे ऐकण्याची क्षमता कमी होणे, उच्च रक्तदाब, निद्रानाश, नैराश्य आणि इतर अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात.
ध्वनी प्रदूषणामुळे प्राणी आणि पक्ष्यांच्या जीवनचक्रावरही नकारात्मक परिणाम होतो.
डीजेच्या आवाजामुळे लोकांना अस्वस्थता येते आणि सामाजिक शांततेवर विपरित परिणाम होतो.
डीजे बंदी कायद्याचे पालन करणे अनिवार्य आहे.
डीजेमुळे ध्वनी प्रदूषण झाल्यास, ध्वनी प्रदूषण नियंत्रक अधिनियम १९८५ व पर्यावरण अधिनियम ८५ च्या कलम १५ नुसार ५ लाख रुपयांपर्यंत दंड व पाच वर्षांपर्यंत सक्षम कारावासाची शिक्षा होऊ शकते. पण नुसत्या डीजेच्या आवाजावर नियंत्रणाने प्रश्न सुटणार नसून उत्सवही साधेपणाने साजरे होणे गरजेचे आहे.
0 Comments