खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, August 26, 2025

खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत

 खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत



                                                                                  -पालकमंत्री गोरे

       सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-  जिल्हा क्रीडा संकुलमधून भविष्यात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी जिल्हा क्रीडा संकुलमध्ये अधिकाधिक दर्जेदार सुविधा निर्माण करून द्याव्यात, तसेच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी  दिल्या .
      जिल्हाधिकारी कार्यालय  नियोजन भवन येथे आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील जिल्हा क्रिडा अधिकारी नरेंद्र पवार,  जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप  पवार उपस्थित होते.
            यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्यासाठी जिल्हा क्रिडा संकुलात सध्या सुरु असलेली विविध क्रीडा प्रकारांच्या पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत तसेच यांनी शासकीय मैदान नेहरूनगर येथील विविध सुविधाबाबतचा  आराखडा विहित पद्धतीचा अवलंब करून तयार करावा. तसा प्रस्ताव व अंदाजपत्रक लवकरात लवकर सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      जिल्हा क्रीडा अधिकारी  नरेंद्र पवार यांनी शासकीय मैदान नेहरूनगर  या ठिकाणी 9 एकर इतकी जागा उपलब्ध असून उपलब्ध जागेमध्ये 400 चा मीटर धावून मार्ग त्यास संलग्न वॉकिंग ट्रॅक आहे तसेच विविध खेळाची मैदानी असून या ठिकाणी खेळाडू, महिला, जेष्ठ, नागरिक हे सरावासाठी व व्यायामासाठी येत असतात. सदरचा वॉकिंग ट्रॅक जुना असल्याने मैदानाची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे क्रीडा अधिकारी यांनी यावेळी सांगितले  तसेच मागील सभेचे इतिवृत्त वाचून जिल्हा क्रीडा संकुलात आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याबाबतच्या कामांची सविस्तर माहिती दिली.
               या बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल येथे वाढीव क्रीडा सुविधा, 400 मी. धावन मार्ग सिंथेटिक करणे, बॅडमिंटन हॉल अद्ययावत करणे, मुलामुलींचे वसतीगृह दुरुस्त करणे, अंतर्गत रस्ते, सुंदरम नगर येथील जलतरण तलाव दुरूस्तीस निधी, करण्यासाठी अंदाजपत्रके व आराखडे तयार करून घेण्यास मान्यता  मिळणे यासह अन्य कामांबाबत चर्चा करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages