Hot Posts

6/recent/ticker-posts

दाते प्रशालेत उत्साहात गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न

 दाते प्रशालेत उत्साहात गणेश मूर्ती कार्यशाळा संपन्न




नातेपुते(कटूसत्य वृत्त):-

येथील दाते प्रशालेत नगरपंचायतच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा उत्साहात पार पडली. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध कलाकार स्वप्नील कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने स्वतःच्या हाताने मातीपासून इको-फ्रेंडली गणेश मूर्ती तयार केल्या.

कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. मुलांनी कल्पकतेचा वापर करून विविध आकर्षक मूर्ती बनवल्या. स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वरी शेडे हिने प्रथम क्रमांक, ईश्वरी तनुजा माने हिने द्वितीय क्रमांक, तर आदिती खर्डे हिने तृतीय क्रमांक मिळवला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कला, सर्जनशीलता आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली. पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या प्रयत्नांचे कौतुक करत पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाला मुख्याध्यापक विनायक देशपांडे, उपमुख्याध्यापक नवनाथ बांगर, निरीक्षक निता मदने, संजय नाळे, अशोक मखरे, प्रणव बाडगंडी, चैतन्य पागे, कलाकार स्वप्नील कुंभार तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments