श्रीकृष्ण देवस्थानच्यावतीने दहिहंडीचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीकृष्ण देवस्थान वडार समाज संस्थेच्या वतीने शनिवारी भव्य दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण साळुंके यांनी दिली.
श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त यावर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाचे हे ७५ वे वर्ष आहे.श्रीकृष्ण जन्मोत्सव व ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीचे औचित्य साधुन ९ तारखेपासुन अखंड वीणा पारायण सुरु आहे.शुक्रवारी ह.भ.प.भगवंत मोरे महाराज यांच्या उपस्थितीत होमहवन व गुलालाचा कार्यक्रम पार पडणार आहे.आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते,पोलीस उपायुक्त विजयकुमार कबाडे,सांगली समाजकल्याणचे उपजिल्हाधिकारी नागेश चौगुले , आहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय साळुंके जोशी समाजाचे अध्यक्ष युवराज सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दहिहंडीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
0 Comments