Hot Posts

6/recent/ticker-posts

भैरवनाथ शुगर आलेगांव आता 'राजवी ॲग्रो पॉवर शुगर' : सावंत

 भैरवनाथ शुगर आलेगांव आता 'राजवी ॲग्रो पॉवर शुगर' : सावंत


लोंढेवाडी  (कटूसत्य वृत्त):-   भैरवनाथ शुगर, आलेगांव (ता.माढा) हा कारखाना आता 'राजवी ॲग्रो पॉवर शुगर लिमिटेड' या नावाने यापुढे साखर उद्योगात कार्यरत राहणार असल्याची माहिती चेअरमन पृथ्वीराज सावंत यांनी दिली.


यंदा राजवी ॲग्रो पूर्ण क्षमतेने गाळप करणार असून इतर कारखान्यांच्या तोडीस तोड दर देणार असल्याचेही पृथ्वीराज सावंत यांनी सांगितले. तत्कालीन भैरवनाथ शुगर आलेगाव कारखाना हा माढा तालुक्याच्या पश्चिम भागात येत असला तरी संपूर्ण तालुक्यातील ऊस या कारखान्याला गाळपासाठी जात होता. काही तांत्रिक अडचणींमुळे हा कारखाना यंदा सुरू होणार का याची चिंता ऊस उत्पादकांना होती. मात्र या कारखान्यापुढील तांत्रिक अडचणी दूर केल्या असून ऊस उत्पादकांचे हीत डोळ्यासमोर ठेवून प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा 'राजवी ॲग्रो पॉवर अँड शुगर प्रायव्हेट लिमिटेड' हा कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करणार असून ऊस उत्पादकांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आम्ही वचनबद्ध असल्याचे चेअरमन पृथ्वीराज सावंत यांनी सांगितले.


*चांगला दर देणार

प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या गाळप हंगामासाठी आमची जय्यत तयारी सुरू असून यंदा राजवी ॲग्रो शुगर प्रायव्हेट लिमिटेड पूर्ण क्षमतेने गाळप करणार आहे. तसेच तमाम ऊस उत्पादकांचे हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही शेतकऱ्यांना चांगला दर देणार आहोत.

- पृथ्वीराज सावंत, चेअरमन

राजवी ॲग्रो पॉवर अँड शुगर प्रा. लि., आलेगांव


Reactions

Post a Comment

0 Comments