दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय परिषद
कोर्टी (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी, स्वामी चिंचोली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २३ ऑगस्ट रोजी 'इंजिनियरिंग ट्रेडस इन फार्मास्युटिकल
रिसर्च ॲन्ड हेल्थ सायन्स' या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद यशस्वीरीत्या पार पडली.
या परिषदेचे उद्घाटन बीओएसचे चेअरमन डॉ. गणेश दामा, संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ व प्राचार्य डॉ. जॉन डिसूझा यांच्या हस्ते झाले. यावेळी दत्तकलेच्या सचिवा प्रा. माया झोळ उपस्थित होत्या.
डॉ.दामा यांनी शैक्षणिक धोरणे व संशोधनातील नव संधी, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील संशोधनाचे महत्व स्पष्ट करत परिषदेला विशेष मार्गदर्शन केले. प्रा. झोळ यांनी आपल्या भाषणात शैक्षणिक संस्थांनी उद्योग, संशोधन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या उपक्रमांचे महत्त्व तसेच
औषधनिर्माणशास्त्रातील नवीन संशोधन, आरोग्य विज्ञानातील वाढते आव्हान आणि शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले.
परिषदेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून दोन मान्यवर तज्ज्ञांनी आपले सखोल विचार मांडले. डॉ. जॉन डिसूझा यांनी सखोल व्याख्यान दिले. सारंग साळुंखे यांनीही 'नवीन औषध विश्लेषण तंत्रज्ञान' आणि उद्योग - शिक्षण दुव्याच्या महत्त्वावर माहितीपूर्ण सादरीकरण केले. या परिषदेमध्ये विविध भागातून आलेल्या प्राध्यापक, संशोधक, औद्योगिक तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
फार्माकोव्हिजिलन्स व क्लिनिकल रिसर्चमधील संधी, विद्यार्थ्यांसाठी पोस्टर आणि रिसर्च पेपर सादरीकरणाची स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. निवडक उत्कृष्ट सादरीकरणांना प्रमाणपत्रे व पारितोषिके सचिवा प्रा. माया झोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. डॉ. विशाल बाबर यांनी परिषदेचे प्रभावी संयोजन केले. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल दुरंदे यांनी केले तर डॉ. के. श्रीकांतकुमार यांनी आभार मानले.
0 Comments