Hot Posts

6/recent/ticker-posts

गणेशोत्सव व ईद-ए-मिलादनिमित्त पोलिसांचा रूट मार्च, जातीय सलोखा अबाधित राखण्याचे आवाहन

 गणेशोत्सव व ईद-ए-मिलादनिमित्त पोलिसांचा रूट मार्च, जातीय सलोखा अबाधित राखण्याचे आवाहन




नातेपुते  :(कटूसत्य वृत्त):- गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सणांच्या निमित्ताने नातेपुते पोलिस ठाण्यातर्फे  शहरातील चौकातून, गल्लीतून पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे जवान यांचा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चचा उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे, शांतता व सुरक्षतेची खात्री देणे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे, हा होता. दरम्यान, पोलिसांनी प्रमुख बाजारपेठ, संमिश्र वस्ती, तसेच एस.टी. बसस्थानक परिसरात शक्तिप्रदर्शन केले. एस.टी. बसस्थानक येथे दंगा नियंत्रणाबाबत प्रात्यक्षिक घेण्यात आले. यात लाठीचार्ज, ढाल व रायफल वापर, गॅस गन आदींचा सराव करून दाखविण्यात आला. तसेच नातेपुते पोलिस ठाणे हद्दीतील फोंडशिरस गावातही दंगाकाबू सराव घेण्यात आला. संपूर्ण सरावात नातेपुते पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे, पोलिस उपनिरीक्षक धनाजी ओमासे, ३० पोलिस अंमलदार, एक आरसीपी पथक व २५ होमगार्ड सहभागी झाले होते. सणांच्या काळात शहरात शांतता व जातीय सलोखा  टिकविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

चौकटीत :
नातेपुते शहरात गणेशोत्सव व ईद निमित्त पोलीस अधिकारी व कर्मचारी घेऊन रूट मार्च काढण्यात आला. लोकांना शांतता आणि सुरक्षितेचे खात्री देऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचे दाखवून देणे हा रूटमार्चचा उद्देश होता. गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दलाकडून अनेक वेळा ठीक ठिकाणी प्रबोधन केले जाते. सध्या गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात चालू असल्याने नातेपुते शहरात ३० पोलीस कर्मचारी २५ गृह रक्षक दलाचे जवान व ३ पोलीस अधिकारी यांची बंदोबस्तासाठी नेमणूक केली आहे. एसटी बस स्थानक तसेच दहिगाव चौक या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच पोलीस कर्मचारी व अधिकारी वेळोवेळी गणेश मंडळांना भेटी देत आहेत त्यांना कायद्याचे पालन करण्यासाठी आवाहन करत आहेत. 

महारुद्र परजणे ( सपोनी नातेपुते पोलीस ठाणे )


फोटो ओळी :
नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रूट मार्चचे नेतृत्व करताना

Reactions

Post a Comment

0 Comments