Hot Posts

6/recent/ticker-posts

मंगळवेढा मध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने गणपती बाप्पाची आरती करुन दिला एकतेचा संदेश!. झेंडा चौक गणेशोत्सव मंडळ मंगळवेढा

 मंगळवेढा मध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने गणपती बाप्पाची आरती करुन दिला एकतेचा संदेश!.  झेंडा चौक गणेशोत्सव मंडळ मंगळवेढा




मंगळवेढा(कटूसत्य वृत्त):- झेंडा चौक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गुरुवार संध्याकाळी  गणपती बाप्पाची आरती स्थानिक मुस्लिम रहिवाशांच्या हस्ते करण्यात आली. मुजावर गल्ली सराफ गल्ली माने गल्ली जगदाळे गल्ली गैबीपीर मंदिरजवळील झेंडा चौक गणेश उत्सव मंडळाची श्री गणेशाची आरती करुन मुस्लिम समाजानं यावेळी एकतेचा संदेश दिला.  यावेळी बबलू इनामदार, राहील इनामदार, आजर मुजावर, शाहिद मुजावर, वासिफ इनामदार, अझर इनामदार, सद्दाम चाबुकसर, झेंडा चौक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अरविंद नाईकवाडी , उपाध्यक्ष सुमित पाटील, खजिनदार भैया घोडके, लखन चौगुले, रवी नाईकवाडी,  आदी हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments