Hot Posts

6/recent/ticker-posts

आ. अभिजीत पाटील यांनी केली पूर परिस्थिती पाहणी

 आ. अभिजीत पाटील यांनी केली पूर परिस्थिती पाहणी






 पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पिराची कुरोली, वाडीकुरोली, शेळवे, खेडभाळवणी, कौठळी,व्होळे, खेडभोसे,  देवडे, पटवर्धन कुरोली, आव्हे, पेहे, सांगवी, बादलकोट, उंबरे, करोळे,  कान्हापुरी या भागांमध्ये माढा विधानसभा मतदारसंघाचे आ. अभिजीत आबा पाटील यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली. 

यावेळी पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे हे उपस्थित होते. प्रत्येक गावातील नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे अशा सूचना आ. अभिजीत पाटील यांनी दिल्या. देवडे येथील पुराच्या पाण्यामुळे घर संसार उघड्यावर पडलेल्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचे किट देण्यात आलं..
Reactions

Post a Comment

0 Comments