शिवरत्न स्कूल व एस एम पी इंग्लिश स्कूल येथे स्वातंत्र्य दिन साजरा
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शिवरत्न स्कूल व एस एम पी इंग्लिश स्कूल येथे 79 वा स्वातंत्र्यदिन अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस पो.नि.निरज उबाळे,अकलूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, त्याचबरोबर शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील व त्याच बरोबर प्राचार्य अल्बर्ट थरकन सर, बिनो के पावलोस, हजारिका मॅडम हे उपस्थित होते.
संपूर्ण भारतीय लोकांची शान असणारा तिरंगा फडकावत या कार्यक्रमाला सुरुवात झाली. नेत्र दीपक असे विद्यार्थ्यांचे संचलन त्याच बरोबर राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असणारे नृत्य व राष्ट्र गौरवाची काही समूहगीते यावेळी सादर करण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या भाषणांनी राष्ट्रपुरुषांचे व स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या लोकांचे स्मरण केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अल्बर्ट थरकन सर यांनी केले तर बिनो के पावलोस मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व स्वातंत्र्य दिन कसा साजरा करावा याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना पो. नि.उबाळे यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे व सातत्याने कष्ट केल्याने आपण स्वतःला घडवू शकतो व देशाचे एक सुजाण नागरिक बनू शकतो असे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन का साजरा करतात व तो साजरा करण्यामागचा नेमका उद्देश काय याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस एम पी स्कूल अकलूजचा स्कूल कॅप्टन रुद्र सूर्यवंशी याने केले.
0 Comments