अभिनेते सयाजी शिंदे यांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार जाहीर
पुणे (कटूसत्य वृत्त):- पद्मश्री शंकर बापू आपेगावकर चॅरिटेबल ट्रस्ट, निर्मिती मीडिया सोल्युशन्स आणि शीलराज स्टुडिओ संगीत विद्यालय यांनी पर्यावरण क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल प्रसिद्ध अभिनेते आणि सह्याद्री देवराई फाऊंडेशनचे संस्थापक सयाजी शिंदे यांना पर्यावरण क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल जगद्गुरू संत तुकाराम महाराज पर्यावरण जीवन गौरव पुरस्कार 2025 जाहीर केला आहे.
पद्मश्री शंकर बापू आपेगावकर चॅरिटेबल ट्रस्ट धाराशिवचे विवेक विष्णू गपाट, निर्मिती मीडिया सोल्युशनचे देविदास कैलास झुरुंगे आणि शैलराज म्युझिक स्टुडिओ व संगीत विद्यालयाचे सुधीर चव्हाण यांनी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. सदर पुरस्कार वितरण समारंभ ३० ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता श्री रामचंद्र बनकर सभागृह, गोधळेनगर, हडपसर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
0 Comments