शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलचा आरोह ननवरे शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात सहावा
अकलूज (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 5 वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये, शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी चि.आरोह गणेश ननवरे हा राज्यात सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.त्याने मिळवलेल्या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक जितेंद्र माने देशमुख यांच्यासह प्रशालेतील सर्वांनी त्याचे कौतुक केले.
शिष्यवृत्ती परीक्षेतील त्याचे हे यश म्हणजे त्याच्या मेहनतीचे फळ होय तसेच करियरसाठी त्याला मिळालेला आत्मविश्वासच आहे.
300 पैकी 274 गुण मिळवत त्याने हे यश संपादन केल्याबद्दल, शिवरत्न शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा मार्गदर्शक खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील आरोहचे अभिनंदन करून पुढील करियर साठी शुभेच्छा दिल्या.
यापूर्वीदेखील त्याने जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवलेला आहे. तसेच ज्युनिअर आयएस, अभिरूप, मंथन आणि मॅथ्स ओलिंपियाड सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवलेले आहे त्यामुळे परिसरात सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
0 Comments