Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ ची तयारी अंतिम टप्प्यात

 जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ ची तयारी अंतिम टप्प्यात



- जंगम


सोलापूर (सचिन जाधव):- सोलापूर जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अंतर्गत सर्व तयारी पुर्ण झाली आहे.सर्व गावात स्वच्छतेचे सातत्य टिकविण्यासाठी सुचना दिलेल्या आहेत.जिल्ह्याने यापुर्वी देखील या अभियानात चांगली कामगिरी केली आहे.यासाठी १ हजार गुणांची तयारी करणेत आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
  याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले, जिल्ह्सात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अंतर्गत घटकनिहाय तयारी करणेत आली आहे.यासाठी सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाची टीम कार्यरत आहे.येत्या १५ ऑगस्टपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ११२३ पैकी ३५ ग्रामपंचायतीची निवड पध्दतीने तपासणी केली जाणार आहे.गाव कोणते निवडायचे ते केंद्र शासनाची समिती एक दिवस अगोदर यादी तयार करते.

केंद्राच्या पथकाकडून होणार तपासणी

   जिल्ह्सात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमा अंतर्गत सर्व ग्रामपंचायती सहभागी होत असतात.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची अद्यावत माहिती तयार ठेवणेत आलेली आहे.गावातील सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन या घटका अंतर्गत येणारे सर्व बाबीची तपासणी केली जाणार आहे.यातून गाव स्वच्छ व सुंदर ठरणार आहे.याची तयारी पुर्ण झाली आहे.

गुणांचे आधारे होणार मुल्याकन

1. गावातील सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन सुविधासाठी च्या थेट निरीक्षणासाठी १२० गुण
2. ⁠ग्रामस्थांच्या थेट प्रतिसादासाठी १०० गुण
3. गावातील सुविधांच्या वापरा बाबत २४० गुण
4. ⁠प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षणा दरम्यान ५४० गुणांची प्रश्नावली असणार आहे.

    एकुण १ हजार गुणापैकी प्राप्त गुणानुसार देशात व राज्यातील जिल्ह्याचे नामाकन होऊन ग्रामपंचायतची निवड केली जाणार आहे.

या बाबींची तपासणी

गावातील सांडपाणी व घन कचरा व्यवस्थापन व वैयक्तीक शौचालय, सार्वजिनक ठिकाणची स्वच्छता व सार्वजनिक शौचालय, वैयक्तीक स्वच्छता, न कुजणारे घटकांचे व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, घन कचरा व्यवस्थापन व विलगीकरण या घटकांची तपासणी होणार आहे.गावातील कुटूंबांना भेट दिली जाणार आहे.वैयक्तीक स्वच्छता, कचरा विलगीकरणाची माहिती सर्वेक्षणातून प्रश्नावलीद्वारे विचारली जाणार आहे.ओला कचरा व सुका कचरा चे वर्गीकरणा बाबत माहिती घेतली जाणार आहे. हात धुणेचे सवयी,कुजणारे व न कुजणारे कचराचे वर्गीकरण केले आहे की नाही ? वैयक्तीक शौचालय स्वच्छ ठेवली जातात का ? या घटकांची तपासणी समिती कडून केली जाणार आहे.
-अमोल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता )

Reactions

Post a Comment

0 Comments