Hot Posts

6/recent/ticker-posts

नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये व्यासपौर्णिमेचे औचित्य साधून 'गुरुपौर्णिमा' साजरी करण्यात आली.
याप्रसंगी स्कुलच्या मार्गदर्शिका मीना पारखे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी स्कुलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरूंच्या प्रती ऋण व्यक्त करीत असताना इतिहासातील दाखल्यांचे उदाहरणे आपल्या भाषणात दिली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी, सचिवा वर्षाताई विभुते यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी सावली कांबळे हिने केले.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


Reactions

Post a Comment

0 Comments