श्राविका महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उमाबाई श्राविका क. महाविद्यालय व साने गुरुजी कथामाला महाविदयालयीन शाखा सोलापूर यांच्या संयुक विद्यमाने महाविदयालयात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी प्राचार्य सुकुमार मोहोळे हे होते. त्यांनी गुरु - शिष्य कसा असावा, गुरु - शिष्या बद्दलच्या कथा सांगून गुरुपौर्णिमेचे महत्व याबद्दल विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी कु. अक्षरा कांबळे, कु. अमृता माने,कु. पूजा मोहिते या विद्यार्थिनींनीही आपले मनोगत व्यक्त केले. कु. ऐश्वर्या नरोणे हिने स्वागतगीत गाईले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. अंचिका शर्मा हिने केले. अतिथी परिचय कु. नंदिनी भालेराव हिने करून दिला. कार्यक्रमाचे आभार कु. सारिका कदम हिने मानले तर सूत्रसंचालन कु. सप्तशृंगी कवठे या विद्यार्थिनीने केले. यावेळी सर्व शिक्षकांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा.प्रतिभा कंगळे, प्रा. गणेश लेंगरे, प्रा. अविनाश मुळकूटकर, प्रा. अर्चना कानडे, प्रा. सोमनाथ राऊत, प्रा. ज्योती बांगर, प्रा. प्राजक्ता काळे, प्रा. कल्याणप्पा हायगोंडे व महाविदयालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
0 Comments