परोपकारी जीवन जगल्याने प्रतापसिहांचे जीवन सार्थक झाले- इंदुरीकर
अकलूज (कटूसत्य वृत्त):- मी पणाच्या सापाच्या विळख्यात अडकलेला मानव, जीवनातील आनंद हिरावून बसला आहे.अहंकाराचा विंचू खानदानाचे वाटोळे करतो, परंतू माजी सहकार राज्यमंत्री व खा.स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी मात्र जीवनात या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहत परोपकारी जीवन जगल्याने, त्यांचे जीवन सार्थक झाल्याचे ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी सांगितले.
स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील पुण्यतिथी समारंभ समिती व महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या वतीने,अकलूज येथील विजय चौकात कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी ह.भ. प. इंदुरीकर महाराज बोलत होते.
स्व.प्रतापसिंह मोहिते पाटील पुण्यतिथी समारंभ समिती व महाराष्ट्र जनसेवा संघटनेच्या वतीने स्व.प्रतापसिंह यांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्ताने रुग्णांना फळे,मुलांना खाऊ वाटप तसेच विद्यार्थ्यांना स्व.प्रतापसिंह यांच्या प्रतिमांच्या वह्या वाटप असे अनेक विविध उपक्रम राबविण्यात आले.
तसेच उद्योजक मुबारक यांच्या एम के एंटर प्रायजेसच्या वतीने आयोजीत केलेल्या रक्तदान शिबिरात १२५ दात्यानी रक्तदान केले.यावेळी रक्तदात्यानाही विशेष भेट वस्तू देण्यात आल्या.
तसेच नुकतेच महाराष्ट्र केसरी बहुमान मिळवलेले वेताळ शेळके यांचा, त्यांच्या आई वडिलांसह सन्मान करून, त्यांना समितीच्या वतीने एक लाख रुपयांची देणगी देण्यात आली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट कलाकार हा पुरस्कार मिळवलेले शाहीर राजेंद्र कांबळे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. सोनी टीव्ही वरील महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार बहुमान मिळवलेले ह भ प प्रा.अशोक शिंदे यांचाही समीतीचे अध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी माणिकराव मिसाळ,सतीशनाना पालकर,अण्णासाहेब इनामदार, अण्णासाहेब शिंदे,सुधीर रास्ते,मयूर माने,नवनाथ साठे राजाभाऊ गुळवे, रणजीतसिंह देशमुख, बबनराव शेंडगे,इन्नुस देसाई , विष्णू देवकर,राहुल माने, पिंटू वैद्य, चंद्रकांत गायकवाड, विकास शिंदे,संजय गाडे,ज्योती कुंभार, अरुण शहाणे,शेखर शेंडे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थीत होते.
0 Comments