गर्दीत चुकलेल्या 2852 भावीकांना दिले नातेवाईकांच्या ताब्यात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री. क्षेत्र पंढरपूरयेथे आषाढी वारीच्या कालावधीमधे मिसींग झालेल्या व्यक्तीना त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यासाठी अतलु कुलकर्णी, पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण यांच्या संकल्पणेतून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गाच्या ठिकाणी "तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र "तयार करुन सदर ठिकाणी 1 महिला अधिकारी, 2 महिला अंमलदार, 2 होमगार्ड यांचे पथक तयार केले होते. पालखी मुक्कमाच्या ठिकाणी स्पिकरची सुविधा उपलब्ध करुन मिसींग झालेले व्यक्तीचे नाव व त्यांच्या नातेवाईकाचे नाव पुकारुन त्याना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत होते.
आषाढी यात्रा कालावधीत पंढरपुर शहरात 10 ठिकाणी मिसींग सेल उभारण्यात आले होते. तेथेही स्पिकर आणी माईक ची सुविधा देण्यात आली होती. त्या ठिकाणी ही मिंसीग झालेल्या व्यक्तांची नावे पुकारुन त्यांना त्याचे नातेवाईकाच्या ताब्यात देत होते. यात्रा कालावधीत एकुन 2700 व्यक्तीना स्पिकरवर पुकारुन त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पंढरपुर शहर पोलीस स्टेशन येते मिंसीग सेल स्थापन करुन त्यामधे दोन अधिकारी दोन अंमलदार व चार होमगार्ड ची नेमणुक केली होती तेथे बाहेरील मिंसीग सेल वरील स्पिकरवर पुकारुन ही त्याचे नातेवाईक भेटले नाहीत तर त्याना पोलीस स्टेशन येथे घेवुन येवुन त्याच्या गावातील पोलीस पाटलांशी संपर्क करुन नातेवाईकाशी संपर्क नंबर घेवुन त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. असे एकुन 161 मिंसीग झालेले लोक पंढरपुर पोलीस स्टेशनला हजर झाले होते. त्यापैकी एकुन 152 लोकांना त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देवुन त्यांना सुरक्षित घरी पोहचवण्यात आले आहे.
आषाढी एकादशी दिवशी एकुन 27 ते 28 लाख भावीक पंढरपुर मधे दर्शनासाठी आले होते. अशा गर्दीमधे एकुण 2861 लोक मिसींग झाले होते त्यापैकी एकुण 2852 लोकांना त्याच्या नातेवांकांपर्यत सुरक्षितरीत्या पोहचवण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण शिरगावकर, SDPO, अकलूज, अर्जुन भोसले, SDPO,पंढरपूर यांच्यासह संजय जगताप,पोनि, स्था. गु.शा., विश्वजीत घोडके, पोनि पंढपूर शहर यांच्यासह श्रीमती सुरेखा शिंदे, पोलीस उपनिरीक्षक,भरोसा सेल, श्रीमती मोनिका खडके, पोउपनि पंढरपूर शहर, श्रीमती करिश्मा वनवे, पोउपनि, अकलूज पोस्टे, श्रीमती स्वाती सुरवसे, पोउपनि टेंभूर्णी पोस्टे यांच्यासह भरोसा सेल सोलापूर ग्रामीण येथील महिला अंमलदार व महिला होमगार्ड यांनी पार पाडली आहे.
0 Comments