माऊली तुम्हाला आणखी काही हवं का?
झेडपी अधिकाऱ्यांकडून वारकऱ्यांची आस्थेने विचारपूस
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाच्या ओढीने पालखी सोहळ्या बरोबर पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांची जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संवाद साधला. माऊली आणखी काही हवं का? असं विचारल्यावर वारकरी म्हणाले साहेब खूप चांगली सोय झाली. अंगदुखीसाठी गोळ्याबरोबर मसाजर ठेवला त्यामुळे आमचे आरोग्य चांगले राहणार असे उत्तर आले.
आषाढी वारीचा सोहळा समीप येऊन ठेपला आहे. संतांच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे. रिंगण सोहळ्याने वारकऱ्यां च्या आनंदाला सीमा राहिलेली नाही. पालखी मार्गावर सर्वत्र माऊली, माऊलीचा गजर सुरू आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषद व जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. वारकऱ्यांना निवास, आरोग्य, स्वच्छता, शौचालय, स्नानगृह अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. या उपरी वारकऱ्यांना काही अडचणी भेडसावत आहेत का हे जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील बोरगाव येथे वारकऱ्यांमध्ये जाऊन संवाद साधला. सीईओ जंगम यांनी ज्येष्ठ वारकऱ्यांची संवाद साधून आणखी काय सुविधा करता येतील याची माहिती जाणून घेतली. त्यावर वारकऱ्यांनी प्रशासनाने राबविलेल्या यंत्रणेबाबत समाधान व्यक्त केले. पालखी सोहळ्या बरोबर चालल्याने शरीराला मोठ्या प्रमाणावर थकवा जाणवतो. पाय व अंग दुखीचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. यासाठी बरेच वारकरी पालखी मार्गावर असलेल्या औषध सुविधा केंद्राचा आधार घेतात. अंगदुखीचा सामना करण्यासाठी पेन किलर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पण या वेळेस जिल्हा परिषद प्रशासनाने मसाजरची सोय केल्याने पेनकिलरचा वापर कमी झाला. मसाजर मुळे आराम पडल्यामुळे भाविकांनी प्रशासनाचे आभार मानले. पेन किलर च्या साईड इफेक्ट पासूनही चांगले आरोग्य लाभल्याच्या भावना वारकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री औषधंथाचाही वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला आहे. या औषधाला मेडिकल प्रमाणे सजावट केल्यामुळे वारकऱ्यांना औषधालयाचे सहजपणे माहिती झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या या कल्पनेबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दोन दिवसात 24 हजार वारकरी
पालखी मार्गावर उपलब्ध केलेल्या फूट मसाजर सेवा केंद्राची दोन दिवसात 24 हजार वारकऱ्यांनी लाभ घेतला आहे. वारकऱ्यांनी फूट मसाजर मशीनचा वापर केला ती संख्या पुढील प्रमाणे आहे.
दि 30 जून: धर्मपुरी - 2148,
कारूडे - 4878,
शिंगणापूर फाटा -840, नातेपुते -1617,
वारकऱ्यांनी फूट मसाजर मशीन चा वापर केला संख्या संध्याकाळी दहा पर्यंत (सेंटर वाईज )
दि. 1 जुलै: मांडवे- शिंगणापूर पाटी-635, सदाशिवनगर पेट्रोल पंप-380,
सदाशिवनगर जुने रिंगण तळ-523,
माळशिरस-3510,खुडूस -780,
अकलुज - 662, संग्राम नगर- 1280,यशवंतनगर :-895
दि 2 जुलै: विजोरी 634,जैन मंदिर वेळापूर- 880, वेळापूर पालखीतळ- 800,
बोरगाव- 3567
0 Comments