टेंभुर्णीत बहुजन प्रतिष्ठान तर्फे वारक-यांना मोफत चहा, अल्पोपहार
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- बहुजन प्रतिष्ठान व टेंभुर्णी फेस्टिव्हल कमीटीचे वतीने सालाबादप्रमाणे पंढरपूरला पायी चालत जाण-या जवळपास १० हजार वारकऱ्यांना कुर्डुवाडी चौकामध्ये मोफत चहा व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
चहा व अल्पोपहार वाटपाचे हे सलग एकवीसावे वर्ष असून बुधवार दि.२ रोजी टेंभुर्णी चे पोलिस निरीक्षक नारायण पवार व संस्थापक प्रा.रघुनाथ वाघमारे यांचे हस्ते वाटप करून सुरुवात करण्यात आली.याचा लाभ दहा हजारांहून अधिक वारकऱ्यांना भेटला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.हर्षवर्धन वाघमारे,सौरव वाघमारे, योगेश दाखले, रणजित मोरे,दशरथ कसबे,अप्पा कसबे,रोहन जगताप,संघव वाघमारे,भावेश जैन,अण्णा जगताप, बाळासाहेब मोरे,सुरेश शहा ,विलास आरडे,आदिंनी परिश्रम घेतले.
0 Comments