काव्या देशमुखची सैनिक स्कूलसाठी निवड
माढा (कटूसत्य वृत्त):- काव्या निलेश देशमुख हिची सैनिक स्कूल प्रवेशाच्या पहिल्या फेरीत उत्तर प्रदेशच्या शासकीय सैनिक स्कूल, मैनपुरी येथे निवड झाली आहे. सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत तिने ३०० पैकी २७२ गुण मिळवून हे यश संपादन केले. पहिल्या प्रवेश फेरीत शासकीय सैनिक स्कूल मध्ये निवड झालेली काव्या निलेश देशमुख ही माढा तालुक्यातील एकमेव विद्यार्थी आहे.ती कुर्डूवाडीतील आदर्श पब्लिक स्कुलची विद्यार्थीनी आहे.तिची यावर्षी नवोदय विद्यालय, पोखरापुर साठी निवड झाली होती. तसेच तिला स्कॉलरशिप परीक्षेत 298 पैकी 286 गुण मिळाले आहेत. तिला तानाजी खरात, समाधान व्यवहारे, स्वाती खटके, आई सोनाली परबत-देशमुख, वडील मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल आमदार अभिजित पाटील, गटविकास अधिकारी महेश सुळे, गटशिक्षणाधिकारी विकास यादव, माजी विस्तार अधिकारी शोभा हंडे, केंद्रप्रमुख संजीवनी पौळ-उबाळे, आदर्श पब्लिक स्कुलचे संस्थापक-अध्यक्ष अमोल सुरवसे, प्रकल्प संचालिका पुजा सुरवसे, युवक नेते रावसाहेब देशमुख, उद्योजक सुरज देशमुख,उद्योजक गोरख खटके-पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, प्रदेश संघटक दिनेश जगदाळे,मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल, तांबवे चे सरपंच राजाभाऊ खटके, मेजर अरूण जगताप, रामभाऊ मिटकल, शिवाजीराव गवळी, सचिन महिंगडे, तडवळेचे सरपंच प्रतिनिधी विश्वनाथ परबत, डॉ. संग्राम परबत, डॉ. बालाजी परबत, सरपंच परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष जयंत पाटील, बाळासाहेब देशमुख यांनी अभिनंदन केले. काव्याने भविष्यात युपीएससी क्रॅक करून आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याचा मनोदय व्यक्त केला. तिच्या या यशाबद्दल तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
0 Comments