पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या स्मरणार्थ हन्नूर प्रशालेत विविध उपक्रम
हंजगी : (कटूसत्य वृत्त):- महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी यांचा १० वा स्मृतिदिन हन्नूर येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
प्रशालेचे माजी प्राचार्य सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते कै. पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानंतर या स्मृतिदिनाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा, निबंध
स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. यातील लहान व मोठ्या गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या शिवानी बाळशंकर, दिव्या निकम या विद्यार्थिनींची भाषणे झाली. हन्नूर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक बसवराज बंडगर व सौ. सुरेखा कल्याणशेट्टी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य चंद्रकांत व्हनमाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी प्राचार्य सिद्धेश्वर कल्याणशेट्टी व डोंबरजवळगेचे पालक आप्पाशा पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य अशोक दंतकाळे, माजी मुख्याध्यापक विलास बिराजदार, सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक साखरे, पर्यवेक्षक ज्ञानदेव शिंदे, अप्पासाहेब काळे, मृदुलादेवी स्वामी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्वप्नाली जमदाडे तर मल्लम्मा चप्पळगाव यांनी आभार मानले.
0 Comments