Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी बार्शीत विक्रमी १०१५ जणांचे रक्तदान

 मुख्यमंत्र्यांच्या वाढदिनी बार्शीत विक्रमी १०१५ जणांचे रक्तदान



बार्शी :   (कटूसत्य वृत्त):-  येथे विक्रमी १०१५ जणांनी रक्तदान करून 'रक्तातून राष्ट्रभक्ती' अशा अनोख्या संकल्पनेतून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष बार्शी शहर व तालुका यांच्यावतीने महासंकल्प रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
 रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी आ. राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, रावसाहेब मनगिरे, विजय राऊत, विजय  गरड, रणवीर राऊत, भगवंत रक्तपेढीचे शशिकांत जगदाळे, राहुल मुंढे, सचिन मडके, मदन दराडे, बबन गडदे, प्रशांत कथले, विलास रेणके, अरुण कापसे, सुधीर बारबोले, दशरथ माने, केशव घोगरे, कुंडलिक गायकवाड, रमेश पाटील, संदेश काकडे, दीपक राऊत, कुमार डमरे, मोरे मेजर, राजश्री डमरे आदी उपस्थित होते. या महासंकल्प शिबिरास जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार - सावंत, सोलापूर शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी
 सदिच्छा भेट दिली. भगवंत रक्तपेढीच्या स्वयंसेवकांनी रक्तसंकलन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments