उजनीतून भीमा नदीत सोडले पाणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून गुरुवारी दुपारी 2 वाजलेपासून भीमा नदीपात्रात 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. मागील महिनाभरपासून उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा बुधवार (दि. 23 जुलै) पासून हजेरी लावली असून, उजनी धरणही 95 टक्के भरल्याने भीमा नदीत पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
उजनी धरणाच्या पॉवर हाऊस आऊटलेटमधून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, भीमा नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा देण्यात यावी अशी माहिती उजनी धरणाच्या कार्यकारी अभियंता विभागाने कळविली आहे.
चौकट
उजनी धरण जुलैमध्येच 95 टक्क्यांवर
उजनी धरणावर गेल्या वर्षी 24 जुलै रोजी पाणी पातळी वजा 18.53 टक्के इतकी होती. यंदा मात्र उजनी धरणात सध्या 95.10 टक्के म्हणजे 50.95 टीएमसी इतकी उपयुक्त पाणीसाठा आहे. 1 जूनपासून उजनी धरण क्षेत्रावर 210 मिमी पाऊस पडला आहे. तर उजनीच्या वरील बाजूस असलेला नीरा देवधर 73.14 टक्के तर भाटघर धरण 88.91 टक्के भरले आहे. तर नीरा नदीवरून वीर धरणही 85.50 टक्के भरले आहे.
0 Comments