टेंभूर्णीत पतंगाचा मांजा अडकून १३ वर्षीय मुलगा जखमी
टेंभूर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभूर्णी ता.माढा येथे पतंगाचा मांजा अडकल्याने प्रियांशु बाळासाहेब कदम वय १३ बेंबळे रोड टेंभुर्णी हा मुलगा जखमी झाला असून त्याचे चेह-यावर तीन ठिकाणी टाके घेण्यात आले आहेत.ही घटना जयश्री हॉस्पिटल समोर बेंबळे रोडला सोमवारी सायंकाळी ७ चे सुमारास घडली. चायनिज मांजा हा जीवघेणा असून त्यामूळे अनेकांना जीव गमवावा लागल्याने त्याचे विकण्यावर बंदी आणण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि प्रियांशु बाळासाहेब कदम हा सोमवार दि २८ रोजी किराणा दुकानाला खरेदी करण्यासाठी गेला होता माघारी परत येताना बेंबळे रोडच्या जयश्री हॉस्पिटलच्या समोरून येत असताना तुटलेल्या पतंगाचा मांजा त्यांचे तोंडावर अडकला यामध्ये त्यांचे नाकाचे वर डोळ्यांचे बाजूला व कानाचे मागील बाजूस मांजाने कापूस रक्तबंबाळ झाले आहे.यामध्ये तीन ठिकाणी खोलवर कापले असून तीन्ही ठिकाणी टाके पडले आहे.या घटनेमुळे मांजा लावून पतंग उडवणारे आणि मांजा विकणा-या दुकानातून मांजा जप्त करून दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी केली आहे.
चौकट
टेंभूर्णी शहरातील स्टेशनरी दुकानांमध्ये पतंगाचा मांजा विकण्यास बंदी असताना जर कोणी विकत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल व कोण पतंग मांजा लावून उडवत असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल
*पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंभुर्णी पोलीस स्टेशन*
0 Comments