Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूरवर पुराची टांगती तलवार! चंद्रभागेत 1 लाखाहून अधिक विसर्गानं पाणी, वाळवंट पाण्याखाली

 पंढरपूरवर पुराची टांगती तलवार! चंद्रभागेत 1 लाखाहून अधिक विसर्गानं पाणी, वाळवंट पाण्याखाली





पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.

त्यामुळं तेथी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत आहे. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरणातून 1 लाखाहून अधिक विसर्गाने पाणू सुरु असून पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. चंद्रभागा नदीतील वाळवंट पाण्याखाली गेलं असून, आपत्कालीन यंत्रणा अद्याप झोपलेलीच असल्याचं पाहायला मिळत आहे.

उजनीसह वीर धरणातून चंद्रभागेत पाण्याचा विसर्ग सुरु

पुणे आणि सातारा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून तब्बल 71 हजार 600 तर वीर धरणातून 32 हजार 663 क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत असल्याने चंद्रभागेत प्रचंड पाण्याचा प्रवाह पोहचू लागला आहे. यामुळे चंद्रभागेची पाणी पातळी कमालीची वाढत चालली असून आज रात्रीपर्यंत जवळपास एक लाख क्युसेक विसर्गने पाणी पात्रात पोचणार आहे. आधीच चंद्रभागेतील मंदिरे व वाळवंट आणि पाण्याखाली गेली आहे. सध्या श्रावण महिना असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असून अशा धोकादायक पाण्यात भाविक स्नानासाठी उतरू लागल्याने धोका वाढत चालला आहे. असे असूनही प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा मात्र अजूनही झोपलेलीच असून तातडीने चंद्रभागेत उतरणाऱ्या भाविकांना रोखण्यासाठी बॅरिगेटिंग केले नाही त्यामुळं मोठी दुर्घटना उद्भववण्याची शक्यता आहे. सध्या सातत्याने भाविक चंद्रभागेत बुडण्याच्या घटना समोर येत असताना प्रशासन मात्र अजूनही स्वस्त असल्याने पुन्हा भाविकांना धोका निर्माण होऊ शकतो

चंद्रभागा तीरावर कायमस्वरुपी आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था उभी करण्याबाबत निर्णय घेणार

दरम्यान, चंद्रभागेत सध्या पूरस्थिती निर्माण होत असताना आपत्ती व्यवस्थापन मात्र दिसत नाही, यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता चंद्रभागा तीरावर कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था उभी करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे गोरे यांनी सांगितले आहे. चंद्रभागेला नेहमीच अशी परिस्थिती येऊ लागली असून, काही दुर्घटनाही समोर येऊ लागल्याने आता गांभीर्याने याबाबत निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments