चोरीच्या गुन्ह्यातील तपासाचा छडा लावून नातेपुते पोलिसांकडून दहा लाखांचा मुद्देमाल मालकाला परत
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते पोलिसांनी विविध चोरीच्या गुन्ह्यांचा तपासाचा छडा लावून एकूण १० लाख ८० हजार ८०० रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा ऐवज आणि रोख रक्कम हस्तगत करून संपूर्ण मुद्देमाल मूळ मालकांकडे परत देण्यात आला. देण्यात आलेल्या मुद्देमाल परत मिळाल्याने मालक भारावून गेले होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य होते चोरीस गेलेला मुद्द्यापाल मिळाल्याने फिर्यादी यांनी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांचे आभार मानले.
या तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती या माध्यमांतून तपास पुढे नेला. यामध्ये चंद्रकला सुळ (मोरोची), प्रणव मंत्री (फलटण), चंद्रकांत सोनवणे (नातेपुते), अभिजीत पाटील (पन्हाळा), सुभाष लवटे (वाळवा), ज्ञानेश्वर सुर्वे (इचलकरंजी), शिवाजी मुळीक(मिरज), धनश्री सूर्यवंशी (पलूस), लक्ष्मी जाधव (कोरेगाव), माधुरी तांबोळी (नांदेड) या मूळ मालकांना ऐवज परत केला.जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय जगताप, नातेपुते पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत दिघे, राकेश लोहार, जावेद जमादार, सुभाष गोरे, महादेव कदम, सलम शेख, सोमनाथ मोहिते, अमोल देशमुख यांनी कामगिरी बजावली.
0 Comments